आई

आई तुझ्यासाठी मी काय लिहू,
कसे लिहू आणि किती लिहू,
तुझ्या महतीसाठी शब्दच अपुरे आहेत,
तुझ्या समोर सगळे जगच फिके आहे ।।

आई तुझ्याबद्दल बोलायला मला,
शब्दच उरणार नाहीत,
आणि तुझे उपकार फेडायला मला
हजारो जन्म पुरणार नाहीत ।।

आजपर्यंत तू माझा प्रत्येक हट्ट पूर्ण केला,
अगदी निस्वार्थ भावनेने,
तसेच माझी काळजी घेतलीस निष्ठेने ।।

माझ्या आयुष्यातील शांतता तू,
माझ्या मनातील गारवा तू ,
अंधाऱ्या आकाशातील चंद्र तू ,
ढगाळ वातावरणातील पावसाच्या सरी तू ,

मका वाट दाखवणारा रस्ता तू ,
माझा भास तू, माझा श्वास तू ,
माझ्या कवितेतील शब्द तू,
माझी भक्ती तू , माझी शक्ती तू ,
माझ्या चेहऱ्यावरील हास्य तू !!!

Previous Poem
Next Poem
Spread the love

लगातार अपडेट रहने के लिए सावन से फ़ेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, पिन्टरेस्ट पर जुड़े| 

यदि आपको सावन पर किसी भी प्रकार की समस्या आती है तो हमें हमारे फ़ेसबुक पेज पर सूचित करें|

1 Comment

  1. राही अंजाना - May 16, 2018, 8:41 pm

    Waah

Leave a Reply